दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बाळाचं ठेवलेलं नाव चर्चेत!
![दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बाळाचं ठेवलेलं नाव चर्चेत! Kajal Aggarwal](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Kajal-Aggarwal-780x470.jpg)
मुंबई – Kajal Agarwal Baby Name | सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने एप्रिल महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला. तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि तेव्हापासून ती सोशल मीडियावर आपल्या मुला बाबतीत अनेक गोष्टी शेअर करत असते. तसंच आता काजलने सोशल मीडियावर आपल्या मुलाचे नाव जगजाहीर केलं आहे. काजल आणि तिचा पती गौतम यांनी आपल्या मुलाचे नाव जाहिर करताना होणारा आनंद सुद्धा शेअर केला आहे.
काजलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या बाळाचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. काजलने आपल्या मुलाचे नाव ‘नील’ असं ठेवले आहे. नील नाव मुख्य रुपात आयरिश शब्दापासून उत्पन्न झाले आहे. ज्याचा मूळ अर्थ आहे चॅम्पीयन किंवा फॅशन असा होतो. तसंच काजलने तिच्या बाळाचे नाव शेअर करत सोबत बाळासोबतचा एक गोड फोटो देखील शेअर केला आहे.
दरम्यान, काजलने तिच्या बाळाचे नाव सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी यावर मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून कमेंट्स देखील केल्या आहेत. तसंच काजल नेहमी तिच्या बाळासोबतचे गोड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.