ताज्या बातम्यामहाराष्ट्र
विसापूरवरील गैरप्रकार थांबवा अन्यथा आंदोलन करू : मेमाणे
विसापूर | Visapur Fort – विसापूर गडावरती (Visapur Fort) अनेक गैरप्रकार सध्या जोर धरत आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी गेलो परंतु तिथे आम्हाला धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. बळीराजा व गोमाता यांचे मृतदेह आढळल्याने मन सुन्न झाले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या टाक्यांची दशा अतिशय दयनीय झाली आहे.
तिथल्या स्थानिक लोकांकडून समजले की तिथे पुरातत्त्व विभागाने 4 शिपाई नेमले, परंतु कोणताच कर्मचारी येत नाही. सरकारकडून आलेला निधी नेमका मुरतो कुठे हा गंभीर प्रश्न अाहे. याबाबत पुरातत्त्व विभागात जाऊन जाब विचारणार आहे. त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, कोथरूड विभागाचे शाखाध्यक्ष आणि हिंदु युवा सेनेचे अध्यक्ष तन्मय मेमाणे (Tanmay Memane) यांनी सांगितले.