ताज्या बातम्यामनोरंजन

पूजा हेगडेबरोबर विमानामध्ये घडला विचित्र प्रकार; इंडिगोच्या कर्मचाऱ्याबाबत…

मुंबई | Pooja Hegde Expressed Displeasure With Indigo Employee – बॅालिवूडची अभिनेत्री पूजा हेगडे ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तसंच ती कामानिमित्त जगभरात प्रवास करत असते. आता देखील ती मुंबईबाहेरच आहे. मात्र पूजाबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईमधून दुसऱ्या ठिकाणी जात असताना पूजाबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. इंडिगोच्याच एका कर्मचाऱ्याने पूजाला प्रवासादरम्यान चुकीची वागणूक दिली. हा सगळा घडलेला प्रकार तिने ट्विट करत सांगितला आहे.

“इंडिगोचा कर्मचारी विपुल नकाशेने आम्हाला अगदी वाईट वागणूक दिली, या गोष्टीमुळेच मी खूप दु:खी झाले. कोणतंही कारण नसताना त्याने उद्धटपणे आणि धमकीच्या स्वरुपामध्ये आमच्याशी संवाद साधला. मी अशाप्रकारचं ट्विट कधीच करत नाही. पण आमच्याबरोबर घडलेली ही घटना खरंच खूप भयानक आहे.” पूजाने ट्विट करत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे.

इंडिगो एअरलाइन्सने पूजाचं ट्विट पाहून लगेचच माफी मागितली. इंडिगोने ट्विट करत म्हटलं आहे की, “तुमच्याबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही तुमची माफी मागत आहोत. तुमची संपूर्ण माहिती आम्हाला मॅसेजच्या स्वरुपात पाठवा. लगेचच आम्ही तुमच्याशी संवाद साधू.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये