ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“उर्फी जावेदच्या मागे लागण्यापेक्षा महिलांना…”, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक सल्ला

मुंबई | Sushama Andhare On Chitra Wagh – गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात चांगलाच वाद सुरू आहे. चित्रा वाघ सातत्यानं उर्फीच्या कपड्यांवरून टीका करत आहेत. तसंच त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. अशातच काल (2 जानेवारी) ‘उर्फी जावेद मला भेटली, तर तिच्या थोबडीत मारेन’, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं. यावरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.

“महिलांची सार्वजनिक ठिकाणी छेडछाड झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यावर चित्रा वाघ यांनी बोललं पाहिजे. तो जास्त महत्त्वाचा विषय आहे. उर्फी जावेदच्या मागे लागण्यापेक्षा महिलांना सार्वजनिक ठिकाणी ज्या अत्याचाराचा, समस्यांचा सामना करावा लागतो त्यावर त्यांनी बोलावं”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुढे त्यांनी पुजा चव्हाण प्रकरणावरूनही (Pooja Chavan Case) चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. “राजकीय फायद्यासाठी महिलांचा वापर करणाऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करू नये. खरं तर ज्या मंत्र्याचा महाविकास आघाडीनं राजीनामा घेतला. त्यांनाच आज भाजपने मंत्रीमंडळात सामावून घेतलं आहे. त्यामुळे आता जर संजय राठोड (Sanjay Rathod) निर्दोष असतील तर प्रश्न असा निर्माण होतो, की पुजा चव्हाणला तुम्ही बदनाम का केलं? आपल्याकडे पीडितेचं नाव घेऊ नये, असा अलिखीत नियम आहे. मग तुम्ही केवळ राजकीय शिड्या मजबूत करण्यासाठी एका भटक्या विमुक्त समजातील मुलीच्या अब्रुचं खोबरं उधळलं, त्याचं काय? यावर बोललं जात नाही”, अशी टीकाही सुषमा अंधारेंनी केली.

“गौरी शेलार किंवा रिकीं बक्सल असेल अशा असंख्य मुलींची नावं सांगता येईल, ज्यावर सोयीचं मौन पाळलं जातं. कोणता मुद्दा उचलायचा हे ठरवण्यासाठी आधी त्याची जात कोणती, धर्म कोणता, त्याचा पक्ष कोणता, त्याचा वैचारिक दृष्टीकोन काय आहे? हे तपासलं जातं आणि त्यानंतर त्याला टार्गेट केलं जातं. हे दुर्दैवी आहे”, असंही अंधारे म्हणाल्या.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये