ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमुळे लागलं’- नाना पटोले

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी आमच्यावर आरोप लावला की आमच्या जवळचे डोंगरे ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात गेले आहेत. ते खोटं बोलत आहेत.  ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलं आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. 

नाना पटोले म्हणाले , इम्पिरिकल डेटा दिला जात नाही म्हणून अडचण झाली आहे. मोहन भागवत यांनी आरक्षणाशिवाय भारत पाहिजे अशी अनेकदा घोषणा केली. तसंच आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल मुख्य न्यायमुर्ती यांची भेट घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये