खारी-बिस्किटाच्या पॅकेटवर स्वतःचा फोटो पाहून भारावली अभिनेत्री

मुंबई | कलर्स वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील मल्हार-अंतराची जोडीही प्रेक्षकांना भावली. या मालिकेत मल्हार ही भूमिका अभिनेता सौरभ चौगुले साकारत आहे. तर अंतराच्या भूमिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण आहे. योगिता चव्हाण या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. योगिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकताच योगित चव्हाणनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये योगिता भारावून गेल्याचे गेल्याचे दिसत आहे.
योगिताने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं आहे की, लहानपणी खारी खाताना कधी विचार नव्हता केला की खारी टोस्ट बिस्किट च्या पॅकेटवर कधी माझा फोटो लागेल. एक वेगळंच स्वप्न पूर्ण झालंय. या संधीबद्दल “रुची बेक” यांचे खूप खूप आभार! अंतराच्या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलंय, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय, याबद्दल कलर्स मराठी आणि जीव माझा गुंतला टीमचे मन:पुर्वक आभार.
कलाकारांमध्ये असलेल्या कलेमुळे त्यांना मोठ्या भूमिका मिळत असतात. याच भूमिकांमध्ये कलाकार त्यांच्या अभिनयाने रंग भरत असतात. म्हणूनच प्रेक्षक या कलाकाराचे चेहरे पाहून वस्तू खरेदी करत असतात, यामागं विश्वास असतो. आमक्या एका कलाकारानं याची जाहिरात केली आहे म्हणजे ही वस्तू चांगली असणार असा विश्वास लोकांना असतो. योगितानं देखील जीव माझा गुंतला मालिकेच्या टीमचं आभार मानलं आहे. या मालिकेनं तिला ओळख मिळाली व अशाप्रकारची संधी मिळाली.