शिंदेंच्या शपथविधीआधी ठाकरेंनी फडणवीसांना दिली होती मोठी ऑफर?

मुंबई : (Uddhav Thackeray In Offer Devendra Fadnavis) मागील महिनाभरात राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळ्याल्या. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेशी बंड केल्यामुळं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दरम्यान, बंड केलेले आमदार शिवेसनेत परत येणार नाहीत, असा आंदाज आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मी बाळासाहेबांचा पुत्र सगळी शिवसेना तुमच्यासोबत घेऊन यायला तयार आहे, तुम्ही शिंदे यांना बाजूला ठेवा ही ऑफर दिली होती अशी माहिती समोर येत आहे. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शिंदे यांना बाजूला ठेवा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो असं उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले होते अशी माहिती ‘साम’ने दिली आहे.
त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाकडून आता ही वेळ निघून गेले आहे, उशीर झालेला आहे. असं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं होतं. अशी ऑफर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी शपथविधीआधी फडणवीसांना दिल्याची खात्रीलायक माहिती ‘साम’च्या सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे.