राहुल गांधींच्या सभेला जाणार का? उद्धव ठाकरेंची देहबोलीच उत्तर देऊन गेली
![राहुल गांधींच्या सभेला जाणार का? उद्धव ठाकरेंची देहबोलीच उत्तर देऊन गेली Uddhav Thackeray 19](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/Uddhav-Thackeray-19-780x470.jpg)
मुंबई : (Uddhav Thackeray On Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या बुलढाण्यातील शेगांवमध्ये जनतेला संबोधित करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित राहणार का? असा सवाल केला असता या प्रश्नावर ठाकरेंनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं, मात्र त्यांची देहबोली आणि हातवाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी त्यांना प्रवास, दौरे टाळण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सभेला हजर राहणार नसल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजमधूनच समजलं. यातून ठाकरेंनी या सभेकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे.
महाविकास आघाडीची एकी दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र ठाकरेंसोबत शरद पवारांच्या उपस्थितीबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावत शिवसेना-काँग्रेस एकीची मशाल धगधगत ठेवली आहे.