देवळगाव राजा येथे दुर्दैवी घटना! दहीहंडी उत्सवात गॅलरी कोसळून, मुलगी ठार, तर १ गंभीर..
![देवळगाव राजा येथे दुर्दैवी घटना! दहीहंडी उत्सवात गॅलरी कोसळून, मुलगी ठार, तर १ गंभीर.. Sharad Pawar 48](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/Sharad-Pawar-48-780x470.jpg)
बुलडाणा – देऊळगाव राजा येथे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एक चिमुकली जागीच ठार झाली. तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंग पुरा येथे घडली.
जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोर बांधण्यात आली होती. सदर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदावर चढले होते. दहीहंडी बांधलेल्या दोराला युवक लटकले. त्यावेळी सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी खाली कोसळून दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण (९) ही चिमुकली जागीच ठार झाली. तर अल्फिया शेख हाफिज (८) हिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. प्रथमोपचारनंतर अल्फिया हिला जालना येथे हलविण्यात आले. तर मृतक निदा पठाण हिला ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले होते. जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.