Top 5ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

हिंदुस्तानी भाऊ आणि उर्फीतला वाद टोकाला; भाऊच्या “उर्फी सुधर नाहीतर…” धमकीला “मी कोणालाही घाबरत…” उर्फिचं सडेतोड उत्तर

मुंबई : बिग बॉस फेम उर्फी जावेद (Big Boss Urfi Javed) कायम तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. अनेकवेळा तिला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील केले जाते. मात्र, याचा कसलाही विचार न करता उर्फी परत कमी आणि जगावेगळे कपडे घालताना दिसत असते. दरम्यान, हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) याने उर्फिला धमकी दिली होती. त्यावर उर्फिने सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. (Hindustani Bhau vs Urfi Javed)

काय म्हणाला हिंदुस्तानी भाऊ?
“सुधार उर्फी… जय हिंद! हा मेसेज स्वतःला सर्वात मोठी फॅशन डिझाईनर समजणाऱ्या उर्फी साठी आहे. फॅशनच्या नावाखाली टी जसे कपडे घालतेय याचा चुकीचा परिणाम समजावर होतो. ही भारतीय संस्कृती नाहीये.” तिने जर असे कपडे खलाणे थांबवले नाही तर याचे परिणाम तिला भोईगावे लागतील असा इशाराही हिंदुस्तानी भाऊने व्हिडीओतून दिला आहे. तोच व्हिडीओ शेअर करत उर्फिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय म्हणाली उर्फी जावेद?
“मी कोणालाही घाबरत नाही. हिंदुस्तानी भाऊवर दुटप्पी आहे. त्याच्या टीमने एकदा मला मैत्रीची ऑफर दिली होती, मात्र ती ऑफर नाकारल्यापासून हे लोक माझ्या मागे लागले आहेत. तुम्ही ज्याप्रकारे शिव्या देता, ते आधी सुधारा. तुमच्या शिव्यांमुळे किती लोकं सुधारली आहेत?”असा उलट सवाल उर्फिने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये