![पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; १० शाळकरी विद्यार्थी जखमी, चालक गंभीर auto rikshaw accident](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/auto-rikshaw-accident-770x470.jpg)
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या ऑटोरिक्षाला ट्रकने धडक दिल्याने १० शाळकरी मुले जखमी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीभडक येथून उरुळी कांचन येथील महात्मा गांधी व स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकणारे इयत्ता सातवी व इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थी घेऊन शिक्षा पुणे- सोलापूर महामार्गाने उरुळी कांचनच्या दिशेने जात असताना बोरीभडक ग्रामपंचायत हद्दीत शिक्षाला पिकअपने पाठिमागून ठोकर दिली. या ठोकरीत रिक्षा महामार्गालगत रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. रिक्षा पलटी होऊन रिक्षा चालक जमिनीवर आदळल्याने रिक्षा चालक संदिप कोळपे यांना डोक्याला गंभीर मार बसला आहे.
चालक आणि काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. संदिप कोळपे (रा. बोरी भडक, ता. दौंड , जि. पुणे) असे रिक्षा चालकाचे नाव असून गंभीररीत्या जखमी झाले आहेत. तर अंकुश येलभारे (वय १३) माणसी चंद्रमोहन कोळपे (वय १५), भक्ती बापुराव शिंदे (१५), वैष्णवी आप्पासाहेब गव्हाणे, तणुजा चंद्रमोहन कोळपे (१०), मयूरी अनोक शिंदे (वय १०), अमर बाबुराव शिंदे (वय १२), हर्षल निलेश वाघमारे (वय १४ रा. सर्व बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे ) असे अपघात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ९ विदयार्थी हे महात्मा गांधी महाविद्यालयातील होते तर एक विद्यार्थिनी वैष्णवी ढवळे ही स्वामी विवेकानंद विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणारी आहे. असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, सर्व जखमींना तात्काळ कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने उरुळी कांचन येथील येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व विद्यार्थी हे सुखरुप असून एका विद्यार्थाचा पाय फॅक्चर झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.