पुणेकरांना दिलासा! शहरातील पाणीसंकट टळलं, धरणांमधील पाणीसाठ्यात झाली एवढी वाढ
![पुणेकरांना दिलासा! शहरातील पाणीसंकट टळलं, धरणांमधील पाणीसाठ्यात झाली एवढी वाढ pune dam](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/pune-dam-780x470.jpg)
पुणे | Pune News – पुणे (Pune) शहरात शुक्रवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. तसंच पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केल्यानं पुणेकरांचं पाणीसंकट टळलं आहे. पुण्यातील चारही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिला मिळाला आहे.
खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांंमधून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. तर आता या चारही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या या धरणांमध्ये 93 टक्के (27.16 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं आहे.
खडकवासला धरणामध्ये 0.90 टीएमसी म्हणजे 45.72 टक्के पाणीसाठा, टेमघरमध्ये 2.97 टीएमसी म्हणजे 80.03 टक्के पाणीसाठा, पानशेतमध्ये 10.58 म्हणजे 99.41 टक्के पाणीसाठा आणि वरसगावमध्ये 12.71 टीएमसी म्हणजे 99.10 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.