भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल? या खेपांना निर्यातीसाठी मिळाली मंजुरी

नवी दिल्ली : उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होईल या चिंतेने भारत सरकारने मुख्य अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे. वर्षभरात गहू आणि पिठाच्या किरकोळ किमतीत १४ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्यावर काहीशी शिथिलता दिली देखील देण्यात आली आहे.
जिथे गव्हाची खेप सीमाशुल्क विभागाकडे तपासणीसाठी सुपूर्द केली गेली होती. आणि जी खेप १३ मे किंवा त्यापूर्वी त्यांच्या सिस्टममध्ये नोंदणीकृत झाली आहे, त्यांना निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले सांगितले आहे.
कांडला बंदरावर लोड होऊन इजिप्तला जाण्यासाठी गव्हाची खेप थांबलेली होती. आता तीला देखील केंद्राने परवानगी दिली आहे. या खेपेत ६१,५०० मेट्रिक टॅन गव्हाला परवानगी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.