‘महाराष्ट्राच्या राजकारणातला वाघ नेमका कोण? वाचा सविस्तर… किशोरी पेडणंकर म्हणाल्या…
!['महाराष्ट्राच्या राजकारणातला वाघ नेमका कोण? वाचा सविस्तर... किशोरी पेडणंकर म्हणाल्या... kishori pednekar devendra fadanvis](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/kishori-pednekar-devendra-fadanvis.jpg)
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी उत्तर सभा घेत मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. फोटोग्राफी वरुन वाघ होता येत नाही. कुठल्या संघर्षात तुम्ही होता. पूर्ण सभा ऐकल्यावर वाटलं ही तर लाफ्टर सभा, असा टोला फडणवीसांनी लगावला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी फडणवीस यांच्याअनेक वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला वाघ नेमका कोण आहे हे तुम्ही वेळीच ओळखा, असं म्हणत त्यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
यावेळी अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे. पेडणेकर म्हणाल्या भगवा हा भाजपचा कधीच नव्हता. तुम्ही वानरसेना म्हणत आहात, तर मग पुष्टी मिळाली की राम आमच्या मनात आहे. तुम्ही न्यायालय आहात का? यशवंत जाधव आले तर मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी समर्थन दिले असे होत नाही.
तुम्ही स्वःताच कबुल केले की, मुख्यमंत्री हलके फुलके आहेत. ते आहेतच हलके फुलके. पण तुमचे जसे राजकीय वजन तसे त्यांचेही राजकीय वजन आहे. तुम्ही मेट्रो मॅन असाल तर पापाचे पण धनी व्हा. जी झाडं तोडली जे पशु-पक्षी मारले त्याचेही धनी व्हा, असंही त्यांनी फडणवीसांना खडसूण सांगितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर घेतलेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत भाजपवर सडकून टीका केली आहे.