![जंत, कृमीदोष अन् होमिओपॅथी worm infestion](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/worm-infestion.png)
कृमीदोषावर मात करून कुपोषण व रक्ताशयावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने देशभर राष्ट्रीय जंतनाशक दिवस राबविण्यात येत आहे.
जंताचे प्रकार : जवळजवळ अठरा प्रकारचे जंत सापडतात. त्यामध्ये मुख्यत्वे एंटेरोबियस व्हर्मिक्युलॅरिस, ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडस्, आकडी जंत (हूक वर्म), टेप वर्म इ. प्रकारचे जंत आढळतात.
कशामुळे जंत होतात? :
- आहारातून, पाण्यातून, नखांच्या खोबण्यावाटे जंतांची अंडी पोटात शिरकाव करतात व त्यांची वाढ लहान आतड्यात होते.
- जंताची बाधा झालेल्या रुग्णाच्या विष्ठेतील अंड्यामुळे.
- नीट न शिजवलेले डुकराचे वा गायीचे मांस, तसेच गोड्या पाण्यातील मासे खाल्ल्यास.
लक्षणे :
- गुदद्वाराची जागा खाजवते.
- पोटात कळा येतात. ओकारी, शौचास केव्हाही होते.
- लहान मुले दात कराकरा खातात.
- नाकात बोट घालणे चालू असते.
- पंडूरोग, अन्न अंगी न लागणे, अंगावर पुरळ दिसतात.
- त्वचा लाल होते. त्वचेला आग होते.
- पोट अस्वस्थ राहते व जड फुगल्यासारखे होते.
- शैाचातून रक्त पडते.
- शरीरातील लोह व पंडूर कमी होणे, छातीत धडपडणे व श्वसन भराभर होणे. लहान मुलांत शारिरीक व मानसिक वाढ कमी होणे.
- वजन कमी होते.
- फितीसारखे जंत (टेप वर्ग) या जंताच्या अंड्याचा मेंदूमध्ये शिरकाव होऊ शकतो. तसेच फेफरे येणे, नसांचे वा मानसिक विकार, रुग्णाच्या वागण्या-बोलण्यात फरक होणे.
- आळस, संथपणा, अपानवायू सोडणे, पोट फुगणे इ. लक्षणे जाणवतात. स्त्रियांना योनीस खाज व दाह, मूत्रसंस्थेस संसर्ग होणे.
- निदान
- मलाची प्रयोगशाळेत तपासणी करावी. मलामध्ये जंत व अंडी दिसतात. रक्ताची तपासणी, लोक व पंड़र कमी होतो, इओसिनोफिलिया वाढतो.
काळजी :
- पालेभाज्या वाहत्या पाण्यात धुवाव्यात व मिठाच्या पाण्यात काही काळ बुडवून ठेवून मग शिजवाव्यात. उकळलेले पाणी प्यावे.
- शौचास झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- नखे वाढू देऊ नयेत. मांस व मासे १६० फॅरनहिट तापमानापर्यंत उकळूनच करावेत.
- मळ व पिण्याचा पाण्याच्या संपर्क येऊ देऊ नये.
- परिसर स्वच्छ ठेवावा.
- जेवणापूर्वी हात, पाय व जेवण्याची जागा स्वच्छ करावी.
होमिओपथिक औषधोपचार
१) सिना जंतावरील अत्यंत प्रभावी औषध आतड्यातील जंतामुळे अपचन होऊन ताप येतो. जुलाब होतात, मूल झोपेत दचकते. रुग्णास भूक फार लागते, रूग्ण जेवण भरपूर करतो परंतु तब्येत वाढत नाही. कुपोषित दिसतो. रुग्णास गोड, ब्रेड खायला आवडतात. जेवण केल्यानंतर व पाणी पिल्यानंतर लगेच उलटी व संडास होते इ. लक्षणे रुग्णात दिसल्यास सिना हे औषध कमी शक्तीमध्ये वापरावे.
२) ट्युक्रियम: रुग्णास गुदद्वारास खाज सुटते, गुदव्दार व नाकात गवगवते, झोप व्यवस्थित लागत नाही, भूक लागत नाही, रूग्ण संवेदनशील असतो. वासाची संवेदना जाणवत नाही इ. लक्षणे दिसल्यास ट्युक्रियम हे औषध वापरावे.
३) स्पाईजिलिया : बेंबीभोवती प्रचंड वेदना होऊन रुग्ण बेचैन होतो. शौचावाटे जंत बाहेर पडतात, रूग्णाचा स्वभाव हा घाबरट असून तो चंचल असतो. शौचास वारंवार जावे लागते इ. लक्षणे दिसल्यास स्पाईजिलियाचा वापर करावा.
४) सॅन्टोनाईन : सुतासारख्या जंतावर सॅन्टोनाईनचा वापर करावा. जंतामुळे मुलांची शारिरीक व मानसिक वाढ होत नाही. वजन कमी होते. रुग्ण कुपोषित दिसतो. पाणी पिल्यानंतर व खाल्ल्यानंतर उलटी होते इ. लक्षणे दिसल्यास सॅन्टोनाईनचा वापर करावा.
५) कल्केरिया कार्य: माती खाणे, डोक्यास घाम येणे, जंतामुळे मुलाची मानसिक व शारिरीक वाढ खुंटणे, त्याचबरोबर रुग्ण हा स्थूलप्रकृतीचा असता, घाबरट स्वभावाचा असतो.
6) न पचणारे पदार्थ खायला आवडतात उदा. माती, पेन्सिल, कोळसा, अंडी, मीठ, गोड पदार्थ खायला आवडतात. किरमट ढेकरा येतात व उलटी होते. जंतामुळे रुग्णास प्रचंड भूक लागते. थंड पाणी पिण्याची इच्छा वारंवार होते इ. लक्षणे दिसल्यास कल्केरिया कार्यचा वापर करावा. या औषधांबरोबरच सल्फर, पल्सेटिला, चामोमिला, नेट्रम फॉस, काली मूर नक्स ओमिका, चिलान, मर्क सॉल इ. औषधे योग्य होमिओपथिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास जंतावर मात करून कुपोषण व रक्तक्षयावर होमिओपॅथीच्या माध्यमातून नियंत्रण आणता येईल.