लेखसंडे फिचर

घरात कोणीतरी पुण्यवान हवं…!

वाचावं असं काही…

आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहात होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता; परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्ताला लाथ मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही!

अशाचप्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विदुरासारखे भक्त राहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदुरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले, तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की, ’काका! आपण तीर्थयात्रेला जावे’. जसे विदुराने हस्तिनापूर सोडले, कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्यपण गेले आणि कौरवांच्या मागे कोणीही वारस राहिला नाही!

याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदीआनंद असतो. विचार करा! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरू होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका.

लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी राहा व आपल्या परिवारात कोणी भक्त, भक्ती करीत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडील, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करीत जीवन जगत राहा!! सोबत काही घेऊन आलो नाही व जाताना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा!!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये