वा! जोगेश्वरीच्या मिसळ आणि भेळची चवच न्यारी

झणझणीत मिसळ हा खवय्यांचा लाडका मेनू आहे. तसंच दर्जेदार मिसळपावमुळे काही हॉटेल्स गर्दीने ओसंडून वाहतात. चवदार मिसळ आणि लालजर्द तर्री सर्वांना आवडते. त्यामुळे शहरात मिसळपावची लोकप्रियता वाढली आहे. मटकी-फरसाणचे जमलेले चवदार मिश्रण आणि त्याच्यावर लालजर्द तर्री… अहाहा! प्रत्येक खवय्याच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळपावचे एवढे वर्णन पुरेसे ठरावे. तर अशाच मिसळप्रेमींसाठी जोगेश्वरी मिसळ आणि भेळ हे हॅाटेल प्रसिद्ध आहे.
जोगेश्वरी मिसळ आणि भेळ हे हॉटेल आप्पासाहेब खेसे यांचं आहे. तसंच हे हॉटेल चर्होली फाटा येथे असून, त्यांची मिसळ येथील परिसरातील नंबर १ ची मिसळ आहे. विशेष म्हणजे जोगेश्वरी मिसळ आणि भेळ हॉटेलचं नाव जरी काढलं तरी प्रत्येक मिसळप्रेमीला आठवतो तो तिखट रस्सा, झणझणीतपणा, त्यावर असलेली लाल तर्री, लिंबू, कोथिंबीरीनं सजवलेली आणि लगेच तोंडाला पाणी सुटणारी तर्रीची मिसळ. यामुळेच आजही पुण्यात येणार्या प्रत्येक मिसळप्रेमींना जोगेश्वरी मिसळ आणि भेळ हॉटेलने भुरळ घातली आहे.
जोगेश्वरी मिसळ आणि भेळ या हॉटेलची स्पेशल दही मिसळ, गरमागरम मटकी भेळ, चहा, कॉफी असे अनेक पदार्थ आणि पेय त्यांची स्पेशालिटी आहेत. सोबतच येथील मिसळची चव आणि स्वाद अप्रतिम असल्याने खवय्यांना पुन्हा पुन्हा तेथे येण्याचा मोह होतो. तसेच घामाघूम होऊन मिसळ खाण्याचा आनंद शेकडो खवय्ये घेतात.
मिसळीवर तर्री घेऊन आणखी झणझणीतपणा अनुभवण्याचा काहींचा बेत असतो. हा तिखटजाळ रस्सा त्यांना आकर्षित करतो. तर असंच जोगेश्वरी मिसळ आणि भेळ हॉटेलने खवय्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्याचबरोबर जोगेश्वरीची मिसळ आणि भेळ ही चर्होली, आळंदी, भोसरी आणि दिघी या परिसरात प्रसिद्ध आहे. तसंच गेल्या अनेक वर्षांपासून जोगेश्वरी मिसळ आणि भेळ हॉटेलने आपल्या पदार्थांची चव कायम राखली आहे. त्यामुळे खवय्ये या हॉटेलकडे नेहमी आकर्षित होतात. सोबतच बसण्यासाठी स्वच्छ जागा, प्रसन्न वातावरण, पदार्थांची चवीमुळे हे हॉटेल सर्वांच्या आवडीच बनलं आहे.