माय लिडररणधुमाळी

बापट आणि टिळक हे पुणे भाजपचे भूषणच आहेत : चंद्रकांत गडदे

माझे राजकारणातील आदर्श हे पुणे भाजपचे भूषण असणारे गिरीश बापट आणि मुक्ता टिळक हे आहेत. समाजकारण करीत असताना कळत न कळत मी राजकारणाशी जोडला गेलो. त्यात मला गिरीश बापट साहेब यांची खंबीर साथ मिळाली. त्यांनी गरीब जनतेसाठी अनेक कामे केली आहेत. बापटसाहेब गरीब नागरिक व सामान्य कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात.

पुणे शहरातील असलेल्या अडीअडचणी ते प्रत्येकवेळी समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम करतात. मुक्ता टिळक यादेखील त्यांच्याप्रमाणेच काम करतात. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत. संस्कार केंद्राच्या माध्यमातून गरीब महिलांचे बचत गट तयार केले जातात. त्या माध्यमातून महिलांना रोजगार व घरी बसून कामाची संधी निर्माण करून दिली जाते. याच संस्कार केंद्राच्या मार्फत गरीब मुलांना शालेय साहित्य व अन्य काही मदत असेल ती करण्याचे काम केले जाते. मला जर महापालिका निवडणुकीत संधी मिळाली तर मी येणारी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. ही निवडणूक मी स्थानिक भारतीय जनता पार्टीकडून लढवण्यास इच्छुक उमेदवार आहे.

तिकीट मिळाले की खासदार गिरीश बापट व आमदार मुक्ताताई टिळक व स्थानिक नगरसेवक योगेश समेळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहे. त्यासाठीचे आमचे प्रयत्न चालू आहेत. कोरोना काळात आम्ही गरीब नागरिकांना मास्क, सॅनिटायझर वाटप केले. गरीब जनतेचे मतदान यादीत नाव लावणे, आधार कार्ड काढून देणे, त्याची दुरुस्ती करणे, पॅनकार्ड काढून देणे, आधारकार्ड बँकेला लिंक करून देणे, बचत गटातील अनेक महिला आज स्वकर्तृत्वावर सक्षम झाल्या आहेत. आता या महिला घरी बसून एकप्रकारचा रोजगार कमावत आहेत. मेणबत्ती, अगरबत्ती, मसाल्याचे पदार्थ, अशा छोट्या-मोठ्या अनेक वस्तू महिला बनवत आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला एकप्रकारची मदत मिळत आहे.

याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम घेऊन बक्षीस वितरणाचे कार्यक्रम करून त्यामधून त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. त्याचबरोबर आमच्या प्रभागातील कोणाचा वाढदिवस असेल तर आम्ही एक विशेष गिफ्ट म्हणून महिलांच्या माध्यमातून सकाळी त्यांच्या घरासमोर सडा-सारवण करून रांगोळी काढून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील अनेक कामे मार्गी लावले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये