ताज्या बातम्यारणधुमाळी

महिला उमेदवाराचे चारित्र्यहनन करणाऱ्या अशा या प्रचारांना परिचारकांची मान्यता आहे का ?

सोलापूर | लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार शीगेला पोहोचला असून या मध्ये सोशल मीडिया वरून अर्वाच्या आणि असभ्य भाषेचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे . काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने अत्यंत वाईट पद्धतीने मजकूर लिहून त्यांचे बदनामी केल्याचा प्रयत्न चालवला आहे.

विशेष म्हणजे भाजपा सारख्या सभ्य समजल्या जाणाऱ्या पक्षाचा हा ‘उनाड कार्यकर्ता ‘ इतक्या खालच्या पातळीवर घसरल्याने भाजपा उमेदवाराच्या बद्दलच नापसंती व्यक्त होत आहे. उमेदवार राम सातपुते यांनी अशा उत्साही कार्यकर्त्यांना आवरावे असे आवाहन काँग्रेस कडून होत आहे. राम सातपुते यांच्यावर देखील टीकेचा भडीमार होत आहे. बीडचे पार्सल बीडला पाठवा , निष्क्रिय खासदारांची इजा – बिजा – तिजा , उपरा खासदार अशा अनेक टीका त्यांच्यावरती होत आहेत . परंतु शिंदे यांच्या विरोधात टिकेची पातळी मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी ओलांडलेली दिसते .

एका महिले वर अशा पध्यतीने होत असलेली टीका ही मतदारांना आवडणार नाही त्यामुळे भाजपाच्या विरोधातच याबद्दल एक नकारात्मक वातावरण तयार होत आहे. एका महिला उमेदवाराविरुद्ध होणारे ही टीका सुसंस्कृत महाराष्ट्राला लज्जा आणणारी आहे. भाजपा सारख्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पक्षाचे क्लस्टर हेड म्हणून सध्या प्रशांत परिचारक हे काम पाहत आहेत.. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांची फळी सोलापूर लोकसभा मतदारसंघात कार्यरत आहे . प्रचाराची दिशा देखील ते ठरवत आहेत . त्यामुळे एका महिला उमेदवाराच्या विरोधात अशा अशलाग्य आणि विकृत भाषेमध्ये चालणाऱ्या प्रचाराला त्यांची मान्यता आहे का असा सवाल सोलापूर शहर काँग्रेसने विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये