क्राईमताज्या बातम्यापुणे

इन्स्टाला मृतदेहाची स्टोरी ठेवल्याने तरुणाचा खून; चालाखीने पुरावे नष्ट करणारा आरोपी गजाआड

राजगुरूनगर | पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना खेड तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रासे फाटा येथे एकाने भावाच्या खुनाचे सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्या खून केला आहे. तसेच यातून वाचण्यासाठी दृश्यम चित्रपटाप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावत पुरावे नष्ट केले आहेत. मात्र, पोलिसांनी आरोपींचा हा डाव हाणून पाडून त्याला अटक केली आहे. आदित्य युवराज भांगरे वय- १८ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी अमर नामदेव शिंदे (वय २५) याला अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल पवार हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रासे फाटा (ता. खेड) येथे असलेल्या मराठा हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर काही जणांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात स्वप्नील शिंदे गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी तपास करत असतांना पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनोळखी आरोपीची ओळख पटवून अमर नामदेव शिंदे याला अटक केली.

नेमकं काय घडलं ?

आरोपी राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा मागील तीन महिन्यांपूर्वी खून झाला होता. यातील हत्या झालेला रितेश संजय पवारच्या मृतदेहाचा चेहरा खून झालेल्या आदित्य भांगरेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवला होता. ज्या आरोपींनी रितेशची हत्या केली ते आरोपी आदित्य भांगरेचे मित्र होते. याचा राग आरोपी राहुल संजय पवार होता. त्यामुळे त्याने अमर नामदेव यांच्यासह इतर काही जणांच्या मदतीने आदित्यचे अपहरण केले. त्याला गाडीत बसवून वायरच्या साह्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर त्याचा मृतदेह हा महाराष्ट्र – गुजरात सीमेवर असलेल्या जंगलात अर्धवट जाळण्यात आला.

राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो आदित्य भांगरे याने सोशल मिडीयावर स्टेट्सला ठेवले होते. याचा राग राहुल पवारला होता. यामुळे राहुल पवारने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून १६ मार्चला आदित्य भांगरेचे अपहरण केले. पवारने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खेड तालुक्यातील निमगाव येथे एका निर्जनस्थळी काहीतरी जाळले. तिथे आदित्य भांगरे याचा मृतदेह जाळला असल्याचा बनाव आरोपींनी केला. तर आदित्यचा मोबाईल गोवा येथे एका आरोपीसोबत पाठवन्यात आला. पोलिसांच्या तपासात आदित्य गोवा येथे गेला असल्याचे दिसत होते.

पोलिसांनी तपास केला असता त्यांना आदित्यचा मृतदेह अथवा त्याबाबत कोणताही पुरावा सापडला नाही. मृतदेह सापडला नसल्याने न्यायालयात गुन्हा सिद्ध होणार नाही असे आरोपीना वाटले. मात्र, पोलिसांनी तपास वेगाने करत आदित्याचे ज्या ठिकाणाहून अपहरण झाले तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरुण आरोपी ज्या मार्गाने गेले त्याचा माग काढला. यात आरोपींनी आदित्य भांगरे याचा गाडीत खून करून मृतदेह महाराष्ट्र – गुजरात सीमेवर वेलवाडा येथे जंगलात जळून टाकला. हा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या घटनेची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, महाळुंगे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये