क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

World Cup 2023: फायनलआधीच योगी सरकारचं शमीला खास गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा..

लखनऊ : (Yogi Adiatyanath On Mohammad Shami) टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने कर्तृत्वाने आणि परिश्रमाने मैलाचा दगड रोवला आहे. आयुष्यातील वादळांचा सामना करत शमी टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला. पांड्याला दुखापत झाली अन् संघात शमीची एन्ट्री झाली. शमीने विकेट्सचा सपाटा लावला अन् टीम इंडियासाठी वर्ल्ड कप फायनलचं दार उघडं केलं. अशातच आता वर्ल्ड कप फायनलआधीच मोहम्मद शमीला खास गिफ्ट मिळालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहम्मद शमीला वर्ल्ड कप 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी मोठी भेट दिलीये.

मोहम्मद शमीसाठी खास गिफ्ट
मोहम्मद शमीच्या मूळ गाव अमरोहा येथील सहसपूर अलीनगरमध्ये एक मिनी स्टेडियम बांधण्याची घोषणा योगी सरकारने केली आहे. प्रशासनाच्या या घोषणेनंतर गावातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. सीडीओ अश्वनी कुमार मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी जोया विकास ब्लॉकमध्ये असलेल्या शमीच्या गावाला भेट दिली. स्टेडियमसाठी जागेचा शोध घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत.

मोहम्मद शमीची वर्ल्ड कपमधील कामगिरी
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीने केवळ 6 सामने खेळले. त्यात त्याने 23 खेळाडूंना तंबूत परतवलं. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात शमीने एकट्याने 7 खेळाडू बाद केले अन् फायनलचं तिकीट मिळवून दिलं. त्याचबरोबर शमीने यंदाच्या वर्ल्ड कप रेकॉर्ड मोडून काढत नवे विक्रम रचले आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधील खरा हिरो हा मोहम्मद शमीच असणार हे निश्चित…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये