हनुमान चालीसा म्हणून काही होणार नाही विकासाबाबत बोला; संजय काकडेंचा राज ठाकरेंना सल्ला

पुणे : राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे काढा या भूमिकेनं महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण चांगलंच तापवलंय. अनेक नेत्यांनी त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. आजच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबद्दलची सरकारची भूमिका स्पष्ट केलीयं.
भाजपने राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. मात्र, भाजपचे नेते संजय काकडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर काहीशी नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांनी भोंगे आणि इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे असा सल्ला त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
राज्यातल्या सत्ताधारी पक्षाने आज पर्यंत राज्याच्या विकासासाठी काय केलं, या गोष्टींना राज ठाकरेंनी महत्त्व दिले पाहिजे. असेदेखील काकडे यांनी यावेळी सांगितले.तसंच हनुमान चालिसा म्हsanjay kakade,णून काहीही होणार नाही अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे.