रावसाहेब दानवेंना हवा आहे ‘ब्राह्मण’ मुख्यमंत्री

औरंगाबाद : परशुराम जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जालना येथील कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान केलं आहे. या विधानानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण बघायचा आहे असं त्यांनी म्हटलं.
तसंच मला दिल्लीला जायचं आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. मी सर्वप्रथम आपल्याला भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुनिल किणगावकर यांनाही शुभेच्छा देतो. आता पुन्हा नगरपालिकेची निवडणुका आल्या असून “मी फक्त नगरसेवक किंवा सरकारी नोकरीमध्ये नाही तर महाराष्ट्राचा ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो.” असं रावसाहेब दानवे म्हणाले.
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिकिया देत म्हटलं की,कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो तो मुख्यमंत्री बनू शकतो त्याला जर १४५ आमदारांचा पाठिंबा असला पाहिजे. जातीवर नाही तर बहुमतांची गरज असते असं पवार म्हणाले.