ताज्या बातम्यारणधुमाळी

“‘खोके’ सामनात पोहचले का?”, मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल

मुंबई | Sandeep Deshpande- एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेत चांगलीच फूट पडली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोलमडलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. तेव्हापासून शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामाना’तून (Saamana) नव्या राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसंच आता ‘सामना’तून महाराष्ट्र सरकारची जाहिरात करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेनं शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

‘सामना’च्या मुख्य पानावर माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून महाराष्ट्र सरकारची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचं निमंत्रण टाकण्यात आलं आहे. तसंच या जाहिरातीमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचंही नाव आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर, मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “खोके ‘सामना’च्या कार्यालयात पोहचले का?”, असा खोचक सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसंच “सामनाचं खरं स्वरूप लोकांपुढं आलं आहे. आदित्य ठाकरे रोज सांगतात अनधिकृत सरकार आहे. मग, अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात ‘सामना’त कशी छापली. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही सर्व तत्व बाजूला सारतात. पैसा हेच तुमचं तत्व आहे”, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये