इतरपुणे

गोडाऊनमध्ये केबलचा खच

राष्ट्र संचार न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात टीशी केवल, इंटरनेट, ब्रॉडबैंड आदी विविध सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने विद्युत खांच, झाडांवरून तसेच इमारतीवरून केबल टाकल्या आहेत. शहरात उपडद्यावर केबल टाकण्यास परवानगी नाही. त्यासाठी महापालिकेचे धोरण असून, या केवल भूमिगत टाकणे अपेक्षित आहे. त्याचे दर प्रतिरनिंग मीटर १२ हजार रुपये आहे. त्यामुळे हे शुल्क वाचविण्यासाठी या खासगी कंपन्यांकडून शहरभर ओव्हरहेड केबल टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून, या केबलमुळे पक्षी तसेच महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथदिव्यांना अडथळा निर्माण होत आहे. शहरातील रस्त्यांवर इंटरनेट (Internet) तसेच केबल टीव्ही (Cable TV) च्या बेकायदेशीर लटकल्या ओव्हरहेड केबल (Cables) कोणी काढाव्यात, असा प्रश्न असून, पथ, विद्युत, आकाशाचिन्ह विभागांच्या जबाबदारीत या केबलला अभय मिळत आहे. दुसरीकडे नागरिकांच्या तक्रारीनंतर विद्युत विभागाने शहरातील कारवाई केलेल्या ओव्हरहेड केबल्सचा खच पालिकेच्या गोडाऊनमध्ये पहला आहे. सुमारे वीस ट्रक भरतील एवढ्या फायबर केवान्सचे काय करायचे, असा प्रश्न विद्युत विभागाला पडला आहे. या केवलचा इतर कोणताही उपयोग नसल्याने त्याची विल्हेवाट लावण्यसाठी महापालिकेस (PMC) मोठा खर्च करावा लागणार आहे.
रस्त्याने जाता-येता तुटलेल्या केवलवा त्रास वाहनचालकांना करावा लागत आहे. याप्रकरणी महापालिकेत तक्रारी (Complete) करण्यात आल्या आहेत. आता महापालिकेकडून द्वीप क्लीन ड्राईव्ह (Dweep Clean Drive) राबविला जात आहे. या मोहिमेअंतर्गत २० ट्रक, केबल पालिकेच्या गोडाऊनमध्ये असून, या केबलची विल्हेवाट कशी लामाबी, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये