लेखसंडे फिचरसंपादकीय

‘तुम्ही आहात आदर्श?

आपण इतरांना काय आवडतं याचाच जास्त विचार करतो. अगदी एखादी घरातील सामान्य गृहिणी असली तरी किंवा एखादी पाच अंकी पगार असणारी कर्तृत्ववान महिला असली तरी ती तिच्या नवऱ्याला, मुलांना, घरातील ज्येष्ठ मंडळींना काय आवडतं याचाच विचार करते. अर्थात तिने तो करावादेखील; पण तो विचार कायम तिनेच का करावा? घरातील इतर मंडळींनी का करू नये?

माझी शैक्षणिक काळातील एक मैत्रीण. जिला आजच्या काळात आपण बेस्ट फ्रेंड म्हणावं अशी. जिवाभावाचीही. अनेक गोष्टी आम्ही एकत्र केल्या. अगदी आनंदाचे सोहळे साजरे केले, तर दुःखाचे अनेक डोंगरदेखील एकमेकींच्या साथीने पार केले. दोघीही तशा जेमतेम कुटुंबातून आलेल्या. ती थोडी जास्तच आर्थिक कुचंबणा असणाऱ्या घरातून आलेली. मात्र मानाने प्रचंड श्रीमंत असणारी. प्रत्येकाला जपणारी. प्रत्येकासाठी ती म्हणजे जणू आदर्शच. नकळत तिला आदर्श असण्याचं, आदर्श बनण्याचं आणि इतरांच्या नजरेत आदर्श असल्याचं टिकून राहण्याचं व्यसनच लागलं. या सो कोल्ड आदर्श बनण्याच्या नादात ती जगायचंच विसरून गेली. आपण हे वागलो तर ते काय म्हणतील आणि आपण ते वागलो तर हे काय म्हणतील, याच कोड्यात ती कायम राहायची. ते म्हणतात ना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग… असं काहीसं तिच्याबाबतीत होत असावं. हे तिच्याच नाहीतर अनेकांच्या बाबतीत होतं.

आपण इतरांना काय आवडतं याचाच जास्त विचार करतो. अगदी एखादी घरातील सामान्य गृहिणी असली तरी किंवा एखादी पाच अंकी पगार असणारी कर्तृत्ववान महिला असली तरी ती तिच्या नवऱ्याला, मुलांना, घरातील ज्येष्ठ मंडळींना काय आवडतं याचाच विचार करते. अर्थात तिने तो करावादेखील; पण तो विचार कायम तिनेच का करावा ? घरातील इतर मंडळींनी का करू नये? तिला काय आवडतं, तिला काय हवंय याचा विचार इतर मंडळीच काय, पण ती स्वतःदेखील करीत नाही. कायम इतरांसाठी जगण्याच्या नादात ती स्वतःसाठी कधीच जगत नाही. स्वतःला कायम सुपर वुमन दाखवण्याच्या , आदर्श दाखवण्याच्या नादात आपणदेखील सामान्य स्त्री आहोत याचाच तिला विसर पडतो आणि एका क्षणी जेव्हा सगळं नाकापर्यंत येतं तेव्हा मग तिला याचे गांभीर्य जाणवते. पण अशी परिस्थिती येण्याआधीच जर आपणदेखील माणूस आहोत, आपल्यालाही भावभावना आहेत, आवडीनिवडी आहेत, आपल्याला आपले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे याचे भान असणे फार आवश्यक आहे. नाहीतर आपण कायमच इतरांच्या हातचे बाहुलं बनून जातो.

विशेषतः अशा महिला ज्यांचे आयुष्य कायमच इतरांचा विचार करण्यात गेले आहे त्यांचे मानसिक स्वास्थ्य हे कायमच बिघडलेले असते. माझ्या बघण्यात एक काकू होत्या. ज्या कायमच आपल्या नवऱ्याची कार्बन कॉपी होत्या. तो म्हणेल तेच वागायचं, तेच बोलायचं, तेच लेवायचं, नेसायचं आणि अगदी खायचं देखील तेच. कारण त्या एक आदर्श बायको होत्या. त्यांच्या वयाच्या ४९ व्या वर्षी दुर्दैवाने त्यांना वैधव्य आले. आता मात्र त्यांचा खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू आहे जो प्रचंड जीवघेणा आहे.

खरंतर माणूस म्हणून प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गरजा, भावना, मानसिकता हे सगळंच फार महत्त्वाचं आहे. उगाच आदर्श होण्याच्या नादात आपण आपल्याच भावभावनांचा चुराडा तर करीत नाही ना, याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा.
परवाच त्या काकू सांगत होत्या, त्यांच्या मुलाने त्यांना कांजीवरम सिल्कची पंधरा हजाराची साडी घेतली. लहानपणापासून त्यांना बघत आल्यामुळे आणि आईची चांगली मैत्रीण असल्यामुळे मला हे चांगलंच माहिती होतं की, काकूंच पहिलं प्रेम कॉटन साडी आहे ते. त्यांनी आनंदाने ती साडी नेसली. पण त्यांच्या डोळ्यांतील मलूलपणा खूप काही सांगून गेला. कारण काकू आपल्या आदर्श आई. तुम्ही पण आदर्शच आहात का ???

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये