भोंगा प्रकरणावर सरकार बोलवणार सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेही निमंत्रित

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकेरे यांनी पेटवलेल्या भोंग्याच्या वादावर आता राज्यसरकार सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे. तसेच या बैठकीला राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं असल्याचं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं आहे. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून आज वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले की, “लाऊडस्पीकरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहोत. या सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठकही घेणार आहोत.”
त्याचबरोबर या भोंगा प्रकरणाने राज्यातील वातावरण दिवसेंदीवस चिघळत असल्यानं याबाबत कसल्याही प्रकारचा गैरप्रकार समोर आल्यास कायदा हातात घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.