ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

राहुल गांधीचा PM मोदींसह अदानींवर कडाडून प्रहार, म्हणाले; …तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही

रायपूर : (Rahul Gandhi On Narendra Modi) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) रायपूर पक्षाच्या (Congress) अधिवेशनातून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) भाजप, (BJP) अदानी (Adani) साम्राज्याला बसलेला तगडा हादरा आदी मुद्यांवरून कडाडून प्रहार केला. राहुल गांधी यांनी अदांनीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करत देशातील सर्व पैसा एकाच्या हाती जात असल्याचा घणाघात केला.

स्वातंत्र्यांची लढाई सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीविरोधात होती. त्यांनी सुद्धा देशाचा पैसा लुटण्याचे काम केले होते. आताही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, देशाच्या विरोधात काम होत असल्याने काँग्रेस याविरोधात निकराने लढेल, अशी ग्वाही त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनातून दिली. कमजोर आहे त्याला मारा, ही कोणती देशभक्ती? अशी विचारणाही राहुल गांधी यांनी केली.

अदानी संरक्षण क्षेत्रात काम करतात, तर शेल कंपन्यांची चौकशी का होत नाही? अदांनीवरून संसदेत प्रश्न विचारला जाऊ शकत नाही असं म्हणतात. मात्र, एक नाही, तर हजारवेळा प्रश्न विचारणार आहे. सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, देशाच्या विरोधात काम होत आहे, तर त्याविरोधात काँग्रेस पक्ष उभा राहिल, असा इशारा त्यांनी पीएम मोदींना दिला.

राहुल म्हणाले की, अदानी आणि मोदी एक आहेत. देशातील पैसा एकाच व्यक्तीकडे जात आहे. पायाभूत सुविधा हिसकावून घेत आहेत. काँग्रेस तपस्वींचा पक्ष आहे तो पुजाऱ्यांचा नाही. खरगे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पक्षाला कार्यक्रम द्यावा. सर्व मिळून तपस्येत सामील होऊ. हिंदुस्थानही यामध्ये सामील होईल, हा तपस्वींचा देश आहे. आपण कार्यक्रम राबवा, आम्ही सहभागी होऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

राहुल म्हणाले की, मला भारत जोडो यात्रेत माझ्या जुना गुडघ्याचा त्रास उमटला. त्याचा प्रचंड त्रास होत होता. मात्र, मी कधी तो चेहऱ्यावर येऊ दिला नाही. पहिल्या 15 दिवसात माझा फिटनेसवरील घमेंडी उतरून गेली. मात्र, मला संपूर्ण देश चालायचा होता. मला भारत मातेचा संदेश मिळाला की देश चालायचा आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, मी सरकारी घराला आपले घर समजत होतो. एक दिवस ते घर खाली करावे लागले. मात्र, आज मी 52 वर्षाचा आहे माझे घर नाही. अलाहाबादला कुटुंबाचे घर आहे. मात्र, ते पण माझे घर नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रेनं माझं घर बनवलं. त्या यात्रेत सहभागी होणाऱ्यांना ते घर वाटावे असा माझा प्रयत्न होता. तसेच झाले आणि भारत जोडो यात्रेचे चित्र बदलले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये