“प्रत्येक पक्षात कान फुकरे, माझ्याबाबत त्यांनी उद्धवजींचे…” क्षीरसागरांचा दोन्ही राऊतांवर आरोप!
!["प्रत्येक पक्षात कान फुकरे, माझ्याबाबत त्यांनी उद्धवजींचे..." क्षीरसागरांचा दोन्ही राऊतांवर आरोप! Rajesh Kshirsagar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/Rajesh-Kshirsagar--780x470.jpg)
कोल्हापूर : (Rajesh Kshirsagar On Vinayak Raut) संजय राऊत, विनायक राऊत हे कान फुकरे नेते असून माझ्याबाबतही त्यांनी उद्धवजींचे कान फुंकल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. क्षिरसागरांनी दोन्ही राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. केला. ते म्हणाले, प्रत्येक गटात एकनाथ शिंदे असतात म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी प्रत्येक पक्षात कान फुकरे संजय राऊत, विनायक राऊत असतात हे देखील लक्षात घेतलं पाहिजे.
क्षीरसागर यांनी आव्हाड यांच्यावरही टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणजे नाटक कंपनीतील कलाकार आहेत. त्यांनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटकात काम करावं. खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची वृत्ती असून काहीही करून चर्चेत राहायचं हा आव्हाड यांचा उद्योग असल्याचा टोला यांनी लगावला.
दरम्यान, सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीकडून तीन दिवसांचे भाडे घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.