प्रेमविवाहाला अडथळा असणाऱ्या बापाला मुलीकडून असा झडका, जे पाहून तुम्हीही होताल चकित !

solapur crime : सोलापुरातील माढा तालुक्यात प्रेमासाठी एका मुलीने आपले प्रेम मिळवण्यासाठी मुलीने स्वतःच्या वडिलांनाच अपंग करण्याचा प्लान आखला आणि यशस्वीही केला. वडिलांना अपंग केल्यास ते आपल्यामागे पळापळ करु शकणार नाही, असे तिला वाटल्याने प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केले. माढा शेटफळ मार्गावरील वडाचीवाडी गावानजीक घडली आहे. जखमी वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी माढा पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. मुलगी साक्षी शहा,चैतन्य कांबळे, अतिक लंकेश्वर, मयुर चंदनशिवे, राम पवार, आनंद उर्फ बंड्या जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत.
साक्षी वडिलांसोबत कारने पुण्याहून शेटफळला येत होती.त्यावेळी टॉयलेट आली असा बहाणा सांगून तिने गाडी थांबवली आणि गाडीच्या बाहेर आली त्यानंतर ठरल्याप्रमाणे चौघांनी शहा यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शाह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनतर जखमी शाह यांना माढा येथील पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथून त्यांना सोलापूर (solapur ) येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
हल्ल्याच्या प्रकरणात चौकशीसाठी साक्षीला बोलवण्यात आले असताना तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशी केल्या नंतर साक्षीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. माढा पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आतच प्रकरणाचा छडा लावून साक्षीसह तिचा प्रियकर आणि चौघे हल्लेखोर यांना ताब्यात घेत चौकशी केली व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सर्व आरोपींविरोधात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.