Top 5इतरटेक गॅझेटफिचरमनोरंजनमहाराष्ट्रसक्सेस स्टोरी

भारत-पाक जानी दुश्मनी, पण बॉलिवूडकरांनी दाखवल्या यांच्यातील हटके लव्हस्टोरीज…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जानी दुश्मनी प्रत्येकाला माहितीच आहे. पण याच दोन देशांमध्ये फुललेल्या काही लव स्टोरीज चांगल्या चर्चेत आहेत. सध्या सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला चांगलीच चर्चेत आहे. सीमा भारतीय सचिन मीनाच्या प्रेमात पडली आणि ती बॉर्डर क्रॉस करून भारतात आली. त्यामुळे सध्या सीमा आणि सचिनची लव स्टोरी चांगली चर्चेत आहे. यासोबतच रिअल लव्ह स्टोरी सोबतच रिल लव्ह स्टोरी देखील  चर्चेत आहेत. यामध्ये गदर एक प्रेम कथा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्याचाच आता गदर 2 हा दुसरा पार्ट सध्या चर्चेत आहे. तर आता आपण काही अशा बॉलिवूडच्या चित्रपटांंबाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काही हटके लव्ह स्टोरीज दाखवण्यात आल्या आहेत.

गदर : एक प्रेमकथा – गदर एक प्रेमकथा हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात तारा सिंग आणि सकीनाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. भारताच्या फाळणीवेळी झालेली दंगल आणि त्यात फुललेली लव्ह स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

राजी- राजी हा चित्रपट देखील चांगलाच गाजला होता. या चित्रपटात विकी कौशल आणि आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात 1971 च्या भारत-पाक युद्धाचा काळ आणि हटके लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.

वीर झारा – वीर झारा हा चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीनं पाहतात. शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारत आणि पाक यांच्यातील संबंध दाखवणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता, पण आजही या चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.

एक था टायगर  – एक था टायगर या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सलमान खान आणि कटरीना कैफ यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. हे दोघं भारत-पाक साठी हेरगरी करत असतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. या दोघांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतील होती. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये