क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

नीरज चोप्राची प्रतिष्ठा पणाला! विजेतेपदासाठी घ्यावी लागणार मेहनत, कधी अन् कोठे पाहाता येणार सामना?

Neeraj Chopra Dimond League Final : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. याचबरोबर त्याने डायमंड लीग फायनल्सचे देखील विजेतेपद पटकावल होते. आता हेच विजेतेपद अबाधित राखण्यासाठी तो मैदानावर उतरणार आहे.

गेल्या वर्षी नीरज चोप्राने ज्युरिक डायमंड लीग स्पर्धेतचे विजेतेपद पटकावले होते. या हंगामात त्याने सध्या तरी स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. हा फॉर्म कायम ठेवण्याचा तो या डामंड लीग फायनल्समध्ये देखील प्रयत्न करेल. जर नीरज चोप्रा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला तर तो 30 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळवणार आहे.

तसेच डायमंड ली ट्रॉफीचे विजेतेपद अबाधित राखणारा तो तिसरा खेळाडू होईल. यापूर्वी चेक रिपब्लिकच्या विटेजस्लाव वेस्लीने 2012 आणि 2013 मध्ये डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले होते. तर जॅकब वाडलेज्चने 2016 आणि 2017 मध्ये डायमंड लीग जिंकली होती. नीरज चोप्राचे 89.94 मीटर भालाफेक ही सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. त्याला अजून 90 मीटरचा मार्क पार करता आलेला नाही. या डामयंड लीगमध्ये तो यासाठी देखील प्रयत्नशील असेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये