“साहेब मर्दानचा नेता अन् उद्धव ठाकरे…”, रामदास कदमांची जीभ घसरली; ठाकरेंवर केली सडकून टीका
पुणे | Ramdas Kadam : पुण्यातील (Pune) सासवड (Saswad) येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) यांची जीभ घसरली. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुखे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेत आम्ही जेव्हा कामाला सुरूवात केली तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा रामदास कदमला अनुभव नक्कीच जास्त आहे. तसंच मगाशी नीलम ताई हळूच चिमटा काढून गेल्या. कदाचित कुणाला कळलंही नसेल. पण त्या पुरंदरच्या एअरपोर्टसाठी सगळ्यातआधी मी आंंदोलन केलं आहे. याबाबत उद्धव ठाकरेंना माहितीही नसेल. त्यात खासदार संजय राऊत कधी आले हे मला माहिती नाही, असा खोचक टोला कदमांनी लगावला.
बाळासाहेबांनी शक्य असताना कुठलंच पद घेतलं नाही. पण त्यांचं हे येडं..उद्धव ठाकरेंनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अनंत गितेंना सांगून मला जाणूनबुजून पाडलं होतं. याबाबत जेव्हा बाळासाहेबांना समजलं तेव्हा मला त्यांनी विधानपरिषदेवर घेतलं. तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये आदित्य ठाकरे येऊन बसायचा. त्यामुळे मला खूप भारी वाटायचं. कारण बाळासाहेबांता नातू येऊन बसलाय, पण नंतर तो शासकीय मिटिंगमध्ये येऊन बसायचा. मग ह्याला बोलवा त्याला बोलवा, हे काय ते काय. आता तर वडील मुख्यमंत्री, मुलगा मंत्री अन् नेता तसाच. साहेब मर्दानचा नेता आणि उद्धव ठाकरे गांXचा नेता, अशी सडकून टीका रामदास कदम यांनी केली.
उद्धव ठाकरेंचं नाव इतिहासात नालायक मुलगा म्हणून राहिल. एखाद्याला कसं संपवायचं हे त्यांच्याकडून शिकावं. तसंच गद्दारी कुणी केली हे तुझ्या पिल्लूच्या डोक्यावर हात ठेवून सांग, अशी टीकाही रामदास कदमांनी केली.