हायकोर्टाचा ईडीला झटका! संजय राऊतांच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणीला नकार

मुंबई : (Sanjay Raut Matter, High Court refused ED’s petition) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणीला दुसऱ्याही न्यायाधीशांनी नकार दिला आहे. त्यामुळं ईडीला मोठा झटका बसला आहे. आता त्यांना तिसऱ्या न्यायाधीशांपुढे याचिका सुनावणीसाठी ठेवावी लागणार आहे. राऊत यांनी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ईडीची मोठ्या प्रमाणावर धवपळ होताना दिसत आहे.
दरम्यान, 103 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टाने काही दिवसांपुर्वी जामीन मंजूर केला. कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी राऊतांना दिलेला हाच जामीनाला स्थगिती देण्यासाठी ईडीनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी न्या. भारती डांगे यांच्यापुढं ही याचिका सुनावणीसाठी आली होती. पण हायकोर्टात ही असाईनमेंट बदलल्यानं ती पुढे न्या. कर्णिक यांच्याकडे आली. पण आता न्या. कर्णिकांनी या याचिकेवर वैयक्तिक करणामुळं सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळं आता ईडीला पुन्हा नव्या न्यायमुर्तींपुढं आपली याचिका दाखल करावी लागणार आहे.