व्हेराॅक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी’च्या शिरपेचात मानाचा तुरा
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी घोषित केलेल्या मुलींच्या 19 वर्षाखालील अंतिम पंधरा जणांच्या संघामध्ये आपल्या वराॅक वेंगसरकर अकॅडमीच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. खूशी मुल्ला, आचल अग्रवाल, मयुरी थोरात असे या सर्व खेळाडूंचे नावे आहेत.
त्यानंतर दिलीप वेंगसरकर अकॅडमीकडून फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, या सर्व खेळाडूंनी दिलीप सर तसंच श्रीकांत कल्याणी व इतर सर्व सहकारी कोचेस या सर्वांचं वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. आदरणीय दिलीप सर यांनी वेंगसरकर फाउंडेशन च्या माध्यमातून जी सुविधा आपल्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन खेळाडू आपल्या क्रिकेट अकॅडमी चे नाव मोठं करत आहेत.
यामध्ये आचल अग्रवाल या खेळाडूच मला विशेष कौतुक वाटतं रोज ६० किलोमीटर प्रवास करून नियमितपणे सरावासाठी उपस्थित राहून मेहनत घेऊन पुढे जात आहे. सहकारी मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे खूशी मुल्ला हिची कर्णधार म्हणून निवड. अभिनंदन सर्व सहकारी कोचेस यांचे, असा प्रकारची त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे.