“हुशार, अभ्यासू फडणवीसांना अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय; दूधाची तहान…” राऊतांची जहरी टीका!
!["हुशार, अभ्यासू फडणवीसांना अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय; दूधाची तहान..." राऊतांची जहरी टीका! Vinayak Raut And Shind Fadnavis](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/Vinayak-Raut-And-Shind-Fadnavis--780x470.jpg)
मुंबई : (Vinayak Raut On Shinde-Fadnavis) एकनाथ शिंंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी केली तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोपाचा वाद आता विकोपाला गेला आहे. दोन्ही बाजूकडून टीका करण्याची पातळी दिवसेंदिवस खालावली जाताना दिसत आहे. या बंडखोरीला कारणीभूत असलेल्या भाजपलाही या वादात ओढले जात आहे. आज मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना शिंदे गटासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं, शिवसेना संपवायची, शिवसेनेचे नाव पुसून टाकायचं, आणि या 40 गद्दारांच्या माध्यमांतून शिवसेना संपवण्याचा जो धंदा आहे, तो उधळून टाकायचा आहे. शिवसेना फक्त बाळासाहेबांची आहे, उद्धव साहेबांची आहे हे दाखवूव देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे, असंही राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर देखील हल्ला चढवला आहे, देवेंद्र फडणवीस सारख्या हुशार आणि अभ्यासू माणसावर दूर्दैवाने वाईट दिवस आले. त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. त्यामुळेच फडणवीसांना या अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत असल्याची जहरी टीका राऊतांनी केली. शिंदेंना आता मराठी माणूस आठवत आहे. तेही गुवाहाटी आणि गुजरातला जावून अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.