ताज्या बातम्यामनोरंजन

रुपाली चाकणकर यांचा मुलगा ‘या’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज

पुणे | प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रत्येक पदराला तलम आणि तरल असे अनेक सूक्ष्म पापुद्रे आहेत. प्रत्येक पापुद्र हा वेगळा असला तरीही एकसंघ. प्रेमाचे पापुद्र अलवार, नाजूकपणे जपले पाहिजेत. प्रेम ही अशी भावना आहे जी खूप नाजूक हाताळावी लागते कारण कधीही दुखावली जाऊ शकते, हे सांगणारी एक अनोखी कहाणी ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘विरजण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या ‘विरजण’ मधून अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांची करून देणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. तर ‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे डॉ. संजय चोरडिया, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक प्रवीणकुमार नाहटा, प्रदीपजी नाहर, जुगराजजी जैन, महेंद्रजी पातारे आणि ‘विरजण’ चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम सोहळ्याला उपस्थित होते.

कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रांत कशाचही बंधन नसतं असं म्हटलं जातं, याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव तेलुगू गायिका सत्यावथी मंगली यांनी करून दिली आहे. ‘विरजण’ या चित्रपटातील ‘देवा’ या गाण्याला मंगली यांनी सुमधुर स्वरात स्वरसाज चढवून मराठी सिनेविश्वात नव्याने ठसा उमटविला आहे. या गाण्याला प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विनायक पवार लिखित आहेत. दुर्गेश राजभट्ट याने या गाण्याची म्युझिक प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, तर संकेत टोळे याने हे गाणं मिक्स अँड मास्टर्ड केले आहे. ‘देवा’ या गाण्याला मिळालेल्या मंगलीच्या आवाजासह शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित ‘विरजण’ हा चित्रपट असून या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे, तसेच या चित्रपटाचा उत्तम असा कॅनव्हास व्यंकेट कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा कुठे विरजण घालणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर चित्रपटातील गाण्यांनी ही उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये