बॅक टू नेचर

पाल्याला अटेन्शन डेफिसिट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर तर नाही ना?

नुकतेच काही दिवसांसाठी लग्नाला म्हणून गावाला गेले होते. रेल्वेने प्रवास करताना अनेक लोक आपल्याला भेटतात. त्यात मला अनेक पाच वर्षांखालील मुले भेटली. बहुतांश मुलांमध्ये मी बघितले, की स्थिरता नव्हती त्यातील काही मुले तर खूपच बंड-उड्या मारणे शिव्या देणे बिलकूल आपल्या आई-वडिलांचे ऐकत नव्हते. हा पण एक लहान मुलांचा आजार आहे त्याला म्हणतात अटेन्शन डेफिसिट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर. आज मी या आजारावर माहिती देत आहे. हा आजार मेंदूमध्ये नीट विकास न झाल्यामुळे उद्भवतो. हा आजार शक्यतोवर लहानपणी आढळतो, पण काही रुग्णांमध्ये तो प्रौढावस्थेत दिसून येतो.

या आजारामागे ठोस असे कारण अजून कळले नाही, पण असे म्हणतात, की जर मातेने गर्भावस्थेत चुकीची औषधे घेतली किंवा काही व्यसन केलं तर येणार्‍या बाळांमध्ये अशी लक्षणे आढळतात. सर्वात महत्त्वाचे गर्भावस्थेत जर मातेला खूप ताणतणाव असला आणि प्रसूतीही वेळेच्या खूप अगोदर झाली तरी लक्षणे आढळू शकतात. मी बघितलेल्या रुग्णांमध्ये मला असे आढळले, की ज्या माता प्रसूतीदरम्यान खूप मोबाईलचा वापर करतात, त्या मुलांमध्येसुद्धा ही लक्षणे जास्त आढळतात. सर्वात शेवटचे म्हणजे अनुवांशिकता आणि मेंदूला होणार्‍या इजा कोणत्याही कारणाने बाळाच्या मेंदूला पोटामध्ये किंवा जन्म झाल्यावर इजा झाली तरीही आजार उद्भवू शकतो. एडीएचडी (अतिचंचल अवस्था) असलेल्या मुलांमध्ये मुख्य लक्षणे म्हणून दुर्लक्ष, आवेग आणि हायपरअ‍ॅक्टिव्हिटी दिसून येते. प्रत्येक मुलापरत्वे त्याची तीव्रता आणि लक्षणे बदलू शकतात.

एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित नसणे, एकाग्रता नसणे, घरामध्ये किंवा नातेवाईकांसमोर असभ्य वर्तन समस्या, समवयस्क मुलांच्या तुलनेत वर्तन योग्य नसणे, आवश्यकता नसेल तेव्हा हसणे, किंचाळणे, ओरडणे, एका जागेवर स्थिर न राहणे, सतत हालचाल करत राहणे, सांगितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात न राहणे, शाळेतील अभ्यासातील प्रगती इतर मुलांच्या तुलनेत मागे असणे, शाळेमध्ये मुलांच्या खोड्या करणे. वर्गातील वस्तू उचलणे, फेकणे, एखादी गोष्ट पूर्ण ऐकून न घेणे, विसरणे, एकाग्रता नसल्यामुळे अभ्यासात मागे पडणे, विसरभोळेपणा, नवीन गोष्टी शिकण्यात अडचणी अशी अनेक लक्षणे आढळतात.

ह्या मुलांना हाताळणे खूप मोठी अडचण असते. यांच्यामध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धतीने विशेष असा फरक पडतो. सोबत तुम्ही वेगवेगळ्या थेरपी सुरू करू शकता. होमिओपॅथिक औषधांनी कमीत कमी त्या मुलांमध्ये स्वतःला स्वतःचे करता येईल, एवढा फरकसुद्धा दिसायला लागतो. त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्यावर खूप लक्ष देणे गरजेचे असते. जर अशा मुलांना तुम्ही खूप गोड पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ जास्त प्रमाणात दिले तर त्यांचा आजार हा वाढण्याची शक्यता असते. वेळीच लक्षणे ओळखून उपाय करा.

डॉ. ईश्वरी जोशी नानोटी, (एमडी) होमिओपॅथी मेडिसीन्स

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये