स्टार्ट अप

व्यवसाय करण्यासाठी वय नाही; इच्छाशक्ती पाहिजे

व्यवसाय करायचं वेड लागलं, की वय किती आहे याला जास्त महत्त्व राहत नाही. बर्‍याचदा आपण अनेक तरुण दहावी-बारावी झाल्यानंतर काहीतरी लहान-मोठा व्यवसाय करताना आपण बघितले असतील. असेच एक तरुणाचे प्रेरक ठरणारे उदाहरण आपल्यासमोर आहे. पुण्यातील टिळक रोड येथे असलेल्या लोकप्रिय कपड्याचे दुकान ‘पुरुष क्रिएशन्स’चे मालक शुभम शिंदे. यांचे वय सध्या फक्त २२ वर्षे आहे. गेल्या पाच वर्षांपासून यांनी व्यवसायात पदार्पण केले. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच त्यांनी स्वतःच कपड्याचे एक दुकान शिवणे भागात सुरु केलं.

त्यानंतर वर्षभरातच त्यांनी एक अजून कपड्याचा दुकान सुरू केले आणि ते पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले. पुण्यातील बेस्ट समजल्या जाणार्‍या फॅशनच्या ब्रँड आणि शॉपपैकी पुरुष क्रिएशन्स एक समजले जाते. पुरुषांचे सगळ्या प्रकारचे कपडे येथे मिळतात. पुरुष क्रिएशन्समध्ये ब्रँडेड इंपोर्टेड कपडे, जीन्स, फॉर्मल, कॅज्युअल सर्व प्रकारचे क्वालिटीचे कपडे अगदी परवडतील अशा किमतीत मिळतात. पुण्यातील अनेक भागातून लोक पुरुष क्रिएशन्समध्ये शॉपिंगसाठी येतात. मोठ्या प्रमाणात कॉलेजमध्ये जाणारे तरुण येथील कपड्यांचे चाहते आहेत. खासियत म्हणजे अनेक विद्यार्थी आणि मित्र आपल्या मित्रांना बर्थडे गिफ्ट म्हणून अनेक वेळा याच शॉपवरून कपडे घेतात.

कौतुकाची गोष्ट म्हणजे शुभम यांचे वय सध्या फक्त २२ वर्षे आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून शुभम व्यवसाय क्षेत्रात आहेत. या वयात मुले नोकरीच्या शोधात आपण बघतो. मात्र शुभम सध्या लाखोंची उलाढाल करतात. त्यांच्याकडून अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, असा त्यांचा प्रवास आहे. मला सुरुवातीपासूनच नोकरीची इच्छा नव्हतीच. मला व्यवसायच करायचा होता आणि मी कायम त्याच विचारात असायचो. काही ना काही करीत राहायचो. डोक्यात कायम व्यवसायाबद्दल विचार असायचे. त्यामुळे मी लवकर व्यवसायात उतरलो आणि आता माझा व्यवसाय प्रगतिपथावर आहे. अठरा ते वीस या वयात आपले सोबती चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे, असे शुभम शिंदे सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये