पुणे

वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा आनंदी; खेडमध्ये पेरणीच्या कामांना वेग

खेड तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात कमी अधिक प्रमाणात ओल निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने बैलांच्या साह्याने पिकाची पेरणी करु लागला आहे. तालुक्यात खरीप हंगाम हा महत्त्वाचा हंगाम मानला जातो. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उलाढाली शेतकरी करतात. पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाजाने कृषी व्यवस्थेवर अवलंबून असणारे सर्व उद्योग व्यवसाय समाधानाच्या आशेवर आहेत.
तालुक्यात मान्सून सुरू झालेला नसला तरी वाळवाचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणी करत आहे. तर काही शेतकरी मान्सूनची वाट पाहत थांबले आहेत. खेड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील भुईमूग व सोयाबीन पेरणी सह शेतीच्या कामांना वेग आला आहे.

शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आसल्याने पाऊस पडण्यापूर्वी शेतकरी हा खरीप हंगामाची शेतीची कामे करत असतो. शेतकरी आपल्या शेतामध्ये सकाळ-संध्याकाळ शेतीची कामे करु लागला आहे. शेतकरी आपल्या शेतात नांगरी, पेरणी, भात पिकाची रोपे टाकण्यासह विविध कामे करताना तालुक्यात दिसत आहे. तर अनेक शेतकरी खरीप हंगामापूर्वी बाजरीचे, भुईमुग पिकांची काढणी करताना दिसत आहे. खरीप हंगामामध्ये तालुक्यात भुईमूग, सोयाबीन, बटाटा, भात, मका, पालेभाज्या, बाजरी ही प्रमुख पिके घेतली जातात.

हेही वाचा- पुण्यात सांडपाणी गटारांच्या चेंबरची दुरावस्था; नागरिक त्रस्त

तालुक्यात ५०% क्षेत्रावर पेरणी

तालुक्यात जवळपास ५०% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याचबरोबर पूर्व पश्चिम भागातील महत्त्वाचे असणारे बटाटा पिक शेतकरी घेत असतात. त्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे व बटाटा बियाणे देखील शेतकऱ्यांनी खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आवश्यक असणारी रासायनिक खते देखील काही शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे. तर काही शेतकरी रासायनीक खते खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या गावाला जात आहेत. रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.

हेही वाचा- जुन्नर वन विभाग अंतर्गत बिबट आपत्ती ग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

यावर्षी खेड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा जाणवणार नसून ८०० मेट्रिक टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. DAP चा २०० मेट्रिक टन बफर स्टॉक आहे. युरिया खताचा तुटवडा जाणवल्यानंतर बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला केला जातो. चाकण परिसरात मका पिकाचे क्षेत्र वाढले आहे, अशी माहिती खेड तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी यांनी दिली

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये