ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘माझा मुलगा येतोय त्याचे…”, अभिनेत्री सोनम कपूरचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई : (Sonam Kapoor baby photo viral) अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मुलाच्या जन्मानंतर सोमन मातृत्वाचा आनंद घेत आहे. अनेकदा अभिनेत्रीने मुलगा वायूसोबत फोटो देखील शेअर केले आहेत. मात्र, सोनमने अद्याप चाहत्यांना वायूचा चेहरा दाखवलेला नाही. नुकताच अभिनेत्री सोनम कपूरला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. सोनमला पाहताचं पापाराझींनी सोमनचे फोटो काढण्यास सुरुवात केली.

पापाराझी अभिनेत्रीचे फोटो क्लिक करत असताना सोनमने त्याच्यांकडे एक विनंती केली. सोनम म्हणाली, ‘माझा मुलगा आता येत आहे. त्याचे फोटो क्लिक करु नका…’ अशा विनंती सोनमने पापाराझींकडे केली. त्यांनंतर पापाराझींनी देखील सोनमचं ऐकलं आणि वायूला कॅमेऱ्यात कैद केलं नाही.

सोनमने 20 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. आता सोनमचा मुलगा वायू चार महिन्यांचा झाला आहे. सोनम कायम मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. पण तिने मुलाचा चेहरा अद्याप सोशल मीडियावर दाखवलेला नाही.

गेल्या काही महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली सोनम लवकरच पडद्यावर परतणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (sonam kapoor baby pictures) त्यामुळे आई झाल्यानंतर सोनम पुन्हा अभिनयाला कधी सुरुवात करणार याकडे चाहत्याचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये