ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

पीक विम्यापोटी चुकीने गेले बारा कोटी! पैसे परत करण्याचे बॅंकेचे आदेश, शेतकऱ्यांचा मात्र नकार!

बीड : (Bajaj Alliance On Beed District Farmers) निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काही वर्षात शेतकऱ्यांना अनेक नैकर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. संकटसमयी मदत व्हावी म्हणून शेतकरी पीकविमा (Crop Insurance) कंपनीकडे विना जमा करीत असतात मात्र, त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना पीमा कंपनीकडे मागणी करावी लागते. आंदोलन, उपोषण, मोर्चा या गोष्टींचा सामना कराव लागतो.

मात्र, आता उलट एक गोष्ट घडली आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून तुम्ही आतापर्यंत अनेक आंदोलनं बघितली. म्हणजे हक्काचा विमा भेटत नाही म्हणून राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी (Maharashtra Farmer) केवळ रस्त्यावरच संघर्ष केला. हा संघर्ष रस्त्यावरुन विधानसभेपर्यंत अन् संसदेपासून थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पीक विम्यासाठीची लढाई आपण बघितली आहे. मात्र आता पिकविम्याचा जो उलटा प्रवास सुरू झाला आहे, तोही तेवढ्याच थक्क करणार आहे.

बजाज अलियान्झ (Bajaj Alliance) या कंपनीकडे काही वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील पीक विमा घेण्याची आणि नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तो विमा परत देण्याची जबाबदारी होती. मात्र याच कंपनीच्या खात्यातून तब्बल 12 कोटी रुपये बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून जमा झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर ही चूक बजाज अलियान्झ या कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीने बँकेला पत्र पाठवलं आणि या 12 हजार शेतकऱ्याकडून 12 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश आल्यानंतर शेतकऱ्यांनी कंपनीचा दावा फोल असल्याचा दावा केलाय. नुकसानीपोटी भरलेली विम्याची ही रक्कम असून यातील एक रुपयाही कंपनीला परत करणार नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये