Top 5ताज्या बातम्यापुणेमनोरंजनमहाराष्ट्रविश्लेषण

बालगंधर्व मोहोत्सव विशेष : परिसंवाद – “काम नव्हते ‘तो’ दिवस आज सलग बहात्तर तासांच्या कामाची ऊर्जा देतो”: प्रवीण तरडे

आज एका वेळेला २२ चित्रपट आणि त्याचे संरक्षण कल ७२ तासांची शेड्यूल मी स्वतः लावून घेत आहे, पण त्याचा मला त्रास होत नाही, जेव्हा कधी त्रास होतो, कंटाळा येतो त्या वेळी हातात काम नसताना अर्ध्या भाकरीवर खाल्लेली रात्र मी आठवतो आहे, पुन्हा कामाची नवी उमेद मिळते, अशी प्रांजळ भावना लेखक दिग्दर्शक कलाकार प्रवीण तरडे यांनी बालगंधर्व महोत्सवाच्या यशवंत कार्यक्रमात व्यक्त केली.

यावेळी सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारे, सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते अजय पूरकर, अभिनेते मिलिंद दास्ताने, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मंजिरी प्रसाद ओक व लीड मीडियाचे विनोद सातव व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वांनीच आपल्या यशस्वितेची कहाणी सांगत प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला.

चंद्रमुखीचे अभूतपूर्व प्रमोशन आणि हंबीररावचे अजिबात न केलेले प्रमोशन यावरदेखील ही चर्चा दीर्घ काळ रंगली. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चंद्रमुखीचे प्रमोशन झाले, त्याचसारखे कधीच कुणाचे झाले नाही, असे अमृता खानविलकर यांनी सांगितले, तर हंबीररावचे मार्केटिंग करायचे नाही, हा धोरणात्मक निर्णय घेऊनदेखील हा निर्णय प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर मिळाला, याचे अनुभव प्रवीण तरडे यांनी कथन केले.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आता मराठी चित्रपटसृष्टी तमिळ आणि दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत कशी पोहोचली आहे, त्याचे सोदाहरण अनुभव सांगितले. काल त्यांना शिवाजी गणेशन यांच्याकडून निरोप आला आणि त्यांनी चित्रपटाचे कौतुक करीत त्यांना भेटायला बोलावले होते, हे गुपित लांजेकर यांनी या व्यासपीठावरून केले. अभिनेते प्रसाद ओक यांनी धर्मवीर चित्रपटातील आनंद दिघे यांची कलाकृती सादर करताना जे अनुभव आले ते विशद केले, तर दिघे यांच्याप्रतीची निष्ठा आणि त्यांच्यावर श्रद्धा कशी आहे, याची अनेक उदाहरणे सांगितली.

आदिनाथ कोठारे यांनी चंद्रमुखीच्या सेटवरील अनेक अनुभव सांगत वेगळ्या प्रवाहाचे चित्रपट बनवत असताना धारिष्ट्य गरजेचे आहे, असे विचार मांडले. अजय पूरकर यांनी सांगितले, की हंबीररावांची भूमिका करीत असताना जे लहानपणापासून सदाशिव पेठेतील संस्कार मनावर पडले, त्याचेच प्रतिबिंब जीवनामध्ये उमटत असल्याची माझी भावना होती.

रॅपिड राऊंडमध्ये राजेभोसलेंची बाजी

एका प्रश्नाला दोन पर्याय द्यायचे आणि केवळ एकच सांगून एका शब्दात उत्तरे द्यायची, असा रॅपिड फायर राउंड या कार्यक्रमात घेण्यात आला. यावेळी महामंडळाचे आणि बालगंधर्व महोत्सवाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना निवेदकाने प्रश्न विचारताना, ‘बालगंधर्व परिवार की चित्रपट महामंडळ’ अशी गुगली टाकली. यावर मेघराज राजेभोसले यांनी, ‘दोन्ही’ आणि दोन्ही अध्यक्षपद कायम राहणार, असा विश्वास व्यक्त केला. याला सभागृहातून प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद मिळाली. सध्या चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे , त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये