क्राईमताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

Breaking News: गोळीबाराने पुणे हादरले! सिंहगड परिसरात भरदुपारी गोळीबार

पुणे | Firing In Pune – पुण्यातील सिंहगड रस्ता (Sinhagad Road Pune) परिसरातील सनसिटी (Sun City) रोडवर बांधकाम व्यावसायिकाकडून एकावर गोळीबार (Firing News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (24 जानेवारी) भरदुपारी घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असून गोळीबार करणार्‍या बांधकाम व्यावसायिक संतोष पवार (Santosh Pawar) याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रमेश राठोड (रा. वारजे माळवाडी) असं जखमी झालेल्याचं नाव आहे. (Firing At Sinhagad Road Pune)

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून बाचाबाची झाली आणि बांधकाम व्यावसायिक संतोष पवार (Santosh Pawar) यानं रमेश राठोडवर (Ramesh Rathod) गोळीबार केला आहे. सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्याच्या काही अंतरावरच ही गोळीबाराची (Firing News Pune) घटना घडली. संतोष पवार , देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज अ‍ॅटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी देवा राठोड यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संतोष पवार यांच्याबद्दल एक पोस्ट टाकली. त्यावरून संतोष पवार आणि देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली. दोघांच्या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडले. त्यावेळी संतोष पवार याने त्याच्याकडे असलेले पिस्तुल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने फायर केले. रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागली आहे. जखमी राठोड यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये