ताज्या बातम्यामनोरंजन

वीणाच्या नावाचा टॅटू लपवण्याबाबत शिव स्पष्टच बोलला; म्हणाला, “जेव्हा माझ्या आयुष्यात…”

मुंबई | Shiv Thakare – ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या पर्वापासून मराठमोळ्या शिव ठाकरेची (Shiv Thakare) चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. तसंच त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. शिवने बिग बॉस 16 ची ट्रॉफी जरी जिंकली नसली तरी त्यानं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. सोबतच शिव ठाकरे त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत येतो. शिव आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापची (Veena Jagtap) सातत्यानं चर्चा रंगताना दिसते. तसंच आता शिवने नुकतंच त्याच्या हातावरील टॅटूबद्दल (Tattoo) भाष्य केलं आहे.

बिग बाॅस मराठीमुळे (Bigg Boss Marathi) शिव-वीणा (Shiv-Veena) ही जोडी प्रसिद्धीझोतात आली. तसंच त्यांची लव्हस्टोरी खूप गाजली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. मात्र त्यांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही. पण शिवने बिग बॉस मराठीच्या घरात असताना वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. तो टॅटू त्याच्या हातावर अजूनही आहे. तर नुकताच त्याला हा टॅटू काढून टाकण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर शिवनं स्पष्टच उत्तर दिलं आहे.

शिव म्हणाला की, “जे मी केलं ते मला माहिती आहे. ती व्यक्ती योग्य होती हे मला ठाऊक आहे. आम्ही आता वेगळे झालो असलो तरी त्यावेळी ज्या काही गोष्टी घडल्या त्या योग्य होत्या. ती व्यक्ती माझ्यासाठी योग्य होती. त्यामुळे मला हे लपवण्याची किंवा काढून टाकण्याची काही गरज वाटत नाही. जेव्हा माझ्या आयुष्यात कुणी येईल, तिला हे पाहून वाईट वाटेल किंवा आवडणार नाही तेव्हा मी तो टॅटू काढून टाकेन. पण आता मला त्याची काहीच अडचण नाही. ते मला खुपत नाही आणि त्या व्यक्तीप्रती मला आदर आहे. त्यामुळे ते मी का लपवू?”

“मला जर बिग बॉसमध्ये येऊन कुणाबरोबर रिलेशनमध्ये यायचं असतं तर मी आधी हा टॅटू काढायचा विचार केला असता. पण तसं काही नव्हतं. बाकी माझं आयुष्य सगळ्यांसमोर आहे. माझ्या सगळ्या गर्लफ्रेंडबद्दल मी सांगतो. माझ्या सर्व वैयक्तिक गोष्टी मी सांगतो. त्यामुळे मला लपवायची काय गरज आहे?” असंही शिव ठाकरे म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये