ताज्या बातम्यामनोरंजन

हॅरी पाॅटरचा ‘हॅग्रिड’ कालवश; अभिनेते राॅबी कोलट्रेन यांचं निधन

मुंबई | Robbie Coltrane Death – हाॅलिवूड चित्रपट सीरिज ‘हॅरी पाॅटर’मध्ये (Harry Potter) हॅग्रिडची (Hagrid) भूमिका साकरणारे प्रसिद्ध अभिनेते राॅबी कोलट्रेन (Robbie Coltrane) यांचं निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ते 72 वर्षांचे होते. राॅबी कोलट्रेन गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तसंच कोलट्रेन यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राॅबी कोलट्रेन यांना ‘हॅरी पाॅटर’ सीरिजमधील ‘रूबियस हॅग्रिड’ या पात्रामुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. त्यांना याच नावानं ओळखलं जात होतं. राॅबी अनेक चित्रपटांमध्ये झळकले होते. जेम्स बॉन्डच्या 2 बॉन्डपटात ‘गोल्डनआय’ आणि ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ या दोन्ही चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. राॅबी कोलट्रेन हे एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच उत्कृष्ट लेखक देखील होते. तसंच राॅबी यांच्या निधनाची दु:खद बातमी त्यांच्या एजन्सीने चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, 2011 मध्ये रॉबी यांना त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल ‘बाफता स्कॉटलंड पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं होतं. रॉबी यांनी 1979 मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना बीबीसीच्या ‘A kick up the eighties’ या विनोदी सीरिजमुळे खरी ओळख मिळाली. याबरोबरच त्यांनी इतरही काही सिरियल्स आणि चित्रपटात बऱ्याच भूमिका केल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये