ताज्या बातम्यारणधुमाळी

“कल्याणचा पुढील खासदार मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही”

अंबरनाथ | Raju Patil – मनसे आमदार राजू पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. “कल्याणचा पुढील खासदार मनसेच्या (MNS) मदतीशिवाय होणार नाही”, असा दावा राजू पाटील (Raju Patil) यांनी केला आहे. “मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की”, असंही राजू पाटील म्हणाले आहेत. ते अंबरनाथमध्ये बोलत होते.

अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी काल (30 सप्टेंबर) आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाला भेट देण्यासाठी राजू पाटील आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानीच्या रूपातील देवीचं दर्शन घेतलं. तसंच नुकताच राजू पाटील यांचा वाढदिवस झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केक कापून त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.

दरम्यान, कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे पुढची निवडणूक ठाण्यातून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली, तर खासदार व्हायला आवडेल का? असं राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, “मी आमदारकीलाही उभा राहणार नव्हतो, राजसाहेब (Raj Thackeray) म्हणाले म्हणून उभा राहिलो, त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर राहणार. मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेची दखल घेतल्याशिवाय, मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये