ताज्या बातम्यारणधुमाळी

वसंत मोरेंना अखेर राज ठाकरे भेटणार…

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगा प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ठाकरे यांच्या या वक्तव्यावर स्वपक्षातीलच अनेक नेतेमंडळी नाराज झाले आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांचाही यात समावेश करावा लागेल.

राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे नाराज आहेत. याप्रकरणी सोमवारी सकाळी 11 वाजता वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

 राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये