अर्थइतरताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा, वर्षाला मिळणार ‘इतके’ रूपये

मुंबई | Maharashtra Budget 2023 –सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) जाहीर केला आहे. शिंदे सरकारचा (Shinde Government) हा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. दरवर्षी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या मदतीत राज्य सरकार 6 हजार रुपयांची भर घालून ही रक्कम देणार आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अवकाळी पाऊस, हवामान बदल अशा समस्यांमुळे अन्नदाता ग्रासला आहे. जरी शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले, तरी त्याला हक्काच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे आमची कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका आहे. यंदा अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषीसन्मान निधी योजनेत राज्य सरकारच्या अनुदानाची भर घालण्यात येईल. त्यानुसार आम्ही ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ जाहीर करत आहोत. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी 6 हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आता आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे,” अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

“या योजनेमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये मिळतील. या योजनेचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना होणार असून त्यासाठी 2023-24 साठी 6 हजार 900 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केली जाईल,” असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये