ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

…म्हणून मनसेकडून ‘स्टार नेटवर्क’ला 48 तासांचा अल्टीमेटम

मुंबई | Ameya Khopkar – मनसे (MNS) पक्ष कायमच मराठी भाषा, मराठी पाट्या यावरून सक्रिय असतो. अनेक ठिकाणी, कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेला डावलण्यात येताना दिसून येते. मात्र याविरोधात मनसे पक्ष कायम आवाज उठवत असतो. दरम्यान, मनसेनं एका प्रख्यात वहिनीला 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. मनसेचे अमेय खोपकर (Ameya Khokar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, आगामी प्रो कबड्डी सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क स्टार नेटवर्क यांच्याकडे आहेत. पण हे प्रसारण करताना समालोचनातून मराठी भाषा वगळण्याचा त्यांना हक्क नाही. इतर प्रादेशिक भाषा चालतात मग मराठी का नको’? आयपीएल, सोनी स्पोर्ट्स यांच्याविरोधात अशाच पद्धतीने मनसेने आवाज उठवला होता. तसंच स्टार नेटवर्कला त्यांनी 48 तासांचा अवधी दिला आहे जर त्यांनी हे मान्य केलं नाही तर मनसे आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, सध्या प्रो-कबड्डी लीगचा नववा सुरू सीजन आहे. यावेळी स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. पहिल्या फेरीत एकूण 66 सामने खेळवले जाणार आहेत. गट फेरीपर्यंत एका दिवसात दोन ते तीन सामने खेळवले जातील. बेंगळुरू व्यतिरिक्त पुणे आणि हैदराबादलाही होस्टिंग मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये